Advertisement

महाराष्ट्रात ८१ लाखापेक्षा अधिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, केंद्राकडून कौतुक

महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमही वेगानं सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात ८१ लाखापेक्षा अधिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, केंद्राकडून कौतुक
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. पण यासोबतच महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमही वेगानं सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेचं कौतुक खुद्द केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेचं कौतुक केलंय.

“महाराष्ट्रात लसीकरण मोहिमेसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल केंद्र सरकारनं राज्य सरकारचं कौतुक केलं. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणाच्या आकडेवारीबद्दल सांगितले की, महाराष्ट्रात ८१ लाखांहून अधिक व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.”

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या घडीला राज्यात दिवसाला तब्बल ४ लाख लोकांना लस दिली जात आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.

लसीकरणाचा हा वेग आणखी वाढू शकतो. त्यादृष्टीनं केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अधिकाअधिक लसींचा पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करू, असं सीताराम कुंटे यांनी सांगितलं.

कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक मंगळवारी पार पडली. त्यावेळी सीताराम कुंटे बोलत होते. आतापर्यंत राज्यातील ८२ लाख लोकांचे लसीकरण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्रानं लसीकरण मोहिमेबाबत महाराष्ट्राचं कौतुक केलं असलं तरी राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता चिंताही व्यक्त केलीय. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड ही राज्ये अजूनही कोरोनाची अधिक चिंताजनक स्थिती असलेली राज्ये आहेत.


हेही वाचा

गोरेगाव, वांद्रे आणि चेंबूरमध्ये ७ दिवसात सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा