Advertisement

धारावीत रुग्ण संख्येत घट


धारावीत रुग्ण संख्येत घट
SHARES

मुंबईत करोनाच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील विभाग असलेल्या धारावीत सोमवारी दिवसभरात ४७ रुग्णांची नोंद झाली आहे. जी-उत्तर विभागात धारावी, माहीम, दादरचा समावेश होतो. त्यापैकी, सोमवारच्या रुग्णसंख्येची तुलना केल्यास दादर आणि माहीममधील रुग्णसंख्या ही धारावीपेक्षा जास्त असून अनुक्रमे १२२ आणि ९४ एवढी आहे.

जी उत्तरमधील धारावी, माहीम, दादरमध्ये दिवसभरात एकूण २६३ रुग्ण आढळले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ३,६२१पर्यंत पोहोचली आहे. जी उत्तर हा विभाग गतवर्षी करोना संसर्गापासून नेहमीच केंद्रस्थानी आहे. मधल्या कालावधीत मुंबईत करोना नियंत्रणात असताना धारावीसह माहीम, दादरमध्ये परिस्थिती नियंत्रणात होती. पण मुंबईत जसजसा करोना पुन्हा वाढत आहे, तशी इथल्या विभागांतही रुग्णसंख्या वाढत गेली आहे. सध्या मुंबईत करोना रुग्णसंख्या ११ हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे, जी उत्तर विभागात रुग्ण संख्या किती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण वर्षभरात जी उत्तरमध्ये एकूण १८,६२६ रुग्ण आढळले असून त्यापैकी १४,३६७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या या तिन्ही भागांतील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी पालिकेने मिशन धारावी नव्याने राबविण्यास सुरुवात केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा