चेन्नई सुपर किंग्सचं होम ग्राउंड अाता मुंबई?

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

दोन वर्षांनंतर अायपीएलमध्ये परतलेल्या चेन्नई सुपर किंग्ससमोर अाता अाणखी एक विघ्नं येऊन ठेपलं अाहे. चेन्नईत कावेरी पाणी प्रश्न पेटला असून त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे सर्व होम मॅचेस अाता अन्य ठिकाणी हलवण्यात अाले अाहेत. चेन्नईचे सहा सामने अाता मुंबईतील क्रिकेट क्लब अाॅफ इंडियाच्या (सीसीअाय) स्टेडियमवर किंवा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येतील, अशी चर्चा जोर धरू लागली अाहे. त्यामुळे अाता चेन्नईचं होम ग्राऊंड मुंबई असण्याची दाट शक्यता अाहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ससमोर पुणे, राजकोट, विशाखापट्टणम, केरळ, रांची हेसुद्धा पर्याय उपलब्ध अाहेत.

कावेरीचे पाणी पेटले...

कावेरी पाणी वाटप प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक अाणि तामिळनाडूमधील वातावरण पेटले अाहे. अनेक ठिकाणी रेल रोको, रास्ता रोको करण्यात अाले. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातही काही चाहत्यांनी खेळाडूंच्या दिशेने स्टेडियममध्ये बूट भिरकावले होते.

खेळाडूंना मारण्याची धमकी

पहिल्या सामन्यात अांदोलनकर्त्यांनी मैदानात अाणि मैदानाबाहेरही निदर्शने केली होती. टी. वेलमुरुगन यांच्या अध्यक्षतेखालील थामिझागा वाझवूमुराय काची या तामिळ संघटनेने खेळाडूंना मारण्याची धमकी दिली अाहे. चेन्नईत फिरताना किंवा शाॅपिंग करताना खेळाडूंच्या जीवाचे जर बरे-वाईट झाले तर त्याला अामची संघटना जबाबदार राहणार नाही, असा इशारा वेलमुरुगन यांनी दिला अाहे.


हेही वाचा -

चेन्नईची ‘ब्राव्हो’ कामगिरी, मुंबईला सलामीलाच धक्का

केदार जाधवची अायपीएलमधून माघार

पुढील बातमी
इतर बातम्या