Advertisement

चेन्नईची ‘ब्राव्हो’ कामगिरी, मुंबईला सलामीलाच धक्का


चेन्नईची ‘ब्राव्हो’ कामगिरी, मुंबईला सलामीलाच धक्का
SHARES

हातातोंडाशी आलेला विजय कसा निसटू द्यायचा, याचा वस्तुपाठच मुंबई इंडियन्सनं पुन्हा एकदा दाखवून दिला. वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलच्या ११व्या पर्वाच्या उद्घाटनाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ आरामात विजयाची नोंद करणार असे वाटत असतानाच, ड्वेन ब्राव्हो नावाचे वादळ घोंघावले. चेन्नई सुपर किंग्सचे एकापाठोपाठ फलंदाज माघारी परतत असताना ड्वेन ब्राव्होने अखेरपर्यंत किल्ला लढवत चेन्नईला विजय मिळवून दिला. ब्राव्हो आणि केदार जाधवच्या दमदार कामगिरीमुळे चेन्नईने मुंबई इंडियन्सचे १६६ धावांचे आव्हान १ विकेट्स आणि १ चेंडू राखून पार केले.


मुंबईचा ‘सूर्य’कुमार तळपला

घरच्या मैदानावर खेळताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. इर्विन लुइस (०) आणि कर्णधार रोहित शर्मा (१५) यांनी निराशा केली असली तरी मुंबईकर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचत मुंबईला सुस्थितीत आणले. २९ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकाराची आतषबाजी करत ४३ धावा फटकावून सूर्यकुमारने मुंबईकर चाहत्यांची मने जिंकली. कृणाल पंड्याने अखेरच्या क्षणी (नाबाद ४१) फटकेबाजी करत मुंबई इंडियन्सला ४ बाद १६५ धावसंख्या उभारून दिली.

ब्राव्हो ठरला सुपरस्टार

मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेले १६६ धावांचे आव्हान पार करताना चेन्नई सुपर किंग्सचे सव्वास शेर फलंदाज मुंबईच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर फोल ठरले. शेन वॉटसन (१६), अंबाती रायडू (२२), सुरेश रैना (४), महेंद्रसिंग धोनी (५), रवींद्र जडेजा) यांनी पॅव्हेलियनचा रस्ता धरल्यानंतर केदार जाधव आणि ड्वेन ब्राव्हो यांनी मैदानावर ठाण मांडले. जाधव संथ फलंदाजी करत असताना ब्राव्होने तुफान फटकेबाजी केली. त्याने ३० चेंडूंत ३ चौकार आणि ७ षटकारांचा पाऊस पाडत ६८ धावा फटकावल्या. शेवटच्या षटकांत विजयासाठी सात धावांची आवश्यकता असताना मुस्तफिझुर रहमानने पहिले तीन चेंडू निर्धाव टाकले. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार लगावत केदार जाधवने चेन्नईच्या विजयावर मोहोर उमटवली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा