शिक्षिकेने कानाखाली मारल्याने 10 वर्षीय मुलगी आयसीयूमध्ये

Representative image
Representative image

गेल्या आठ दिवसांपासून नालासोपारा (nala sopara) येथील 10 वर्षीय दीपिका पटेल मृत्यूशी झुंज (battling for life) देत आहे. शिक्षिकेने शिकवणी वर्गादरम्यान तिच्या कानाखाली मारल्याने तिला गंभीर दुखापत (injured) झाली.

दीपिका पटेल ही इयत्ता 5 वीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. तिला मेंदूला गंभीर दुखापत, टिटॅनस विषारीपणा आणि श्वसनक्रिया बंद पडल्यामुळे सायनमधील केजे सोमय्या हॉस्पिटलला आयसीयूत (ICU) दाखल करण्यात आले आहे. तसेच तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

“5 ऑक्टोबर रोजी दीपिका खासगी शिकवणीसाठी गेली होती. तेव्हा तिची शिक्षिका 20 वर्षीय रत्ना सिंग हिने तिच्या उजव्या कानाखाली दोनदा चापट मारली (slapped) कारण ती हसत होती आणि खोड्या करत होती,” असे तिचे वडील अंबादास पटेल (32) यांनी सांगितले. 

दीपिकाचा कान दुखू लागला, ती घरी परतली आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर तिची आई शिकवणी घेत असलेल्या क्लासेस मध्ये शिक्षिकेला जाब विचारला. तेव्हा शिक्षिकेने सांगितले की तिने दीपिकाला कानाखाली चापट मारली कारण ती इतर मुलांना त्रास देत होती.

त्यानंतर तिची आई आणि सिंह यांनी दीपिकाला तुळिंज येथील बालाजी क्लिनिकमध्ये नेले, जिथे तिला औषधे देण्यात आली. संध्याकाळी ते घरी परतले तेव्हा पटेल यांना दीपिकाच्या कानाजवळ सूज दिसली.

 त्यानंतर त्याने तिला तातडीने संजीवनी रुग्णालयात नेले, जिथे तिला एक दिवसासाठी दाखल करण्यात आले. तथापि, कालांतराने तिचा चेहरा सूजू लागला आणि दीपिकाला तिचे तोंड उघडणे कठीण होऊ लागले.

दीपिकाचे वडील अंबादास पटेल म्हणाले, “तीन दिवसांपासून दीपिका काहीही खाऊ किंवा पिऊ शकत नव्हती. त्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि मग आम्ही तिला मुंबईतील (mumbai) सरकारी रुग्णालयात नेले. परंतु तेथे आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने आम्ही तिला 13 ऑक्टोबर रोजी एका ओळखीच्या व्यक्तीद्वारे केजे सोमय्या रुग्णालयात दाखल केले.

तसेच तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांचा खर्च दिवसाला सुमारे 25,000 रुपया इतका आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे आम्ही सामाजिक संस्थांकडे मदतीसाठी विचारत आहोत,” 

मुलीचे पालक अंबादास पटेल यांनी सोमवारी तुळींज पोलिसांकडे धाव घेतली. आणि त्यांच्या तक्रारीवरुन सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. तुळींज पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विनोद वायंगणकर म्हणाले, “आम्ही संबंधित शिक्षकाला नोटीस पाठवली असून पुढील तपास सुरू आहे.


हेही वाचा

मुंबई : पावसामुळे गढूळ पाणीपुरवठा

विमानतळावर 7 दिवसात 120 बनावी बॉम्ब धमक्यांचे कॉल

पुढील बातमी
इतर बातम्या