21 ऑक्टोबरच्या रात्री इंडीयन एअरलाइन्सच्या किमान 30 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. इंडिगो (IndiGo), विस्तारा (Vistara) आणि एअर इंडिया (and Air india) या विमान कंपन्यांची ही उड्डाणे (flights) होती. या धमक्या गांभीर्याने घेतल्या गेल्या आणि सुरक्षेचे उपाय ताबडतोब करण्यात आले, असे ANI ने अहवालात म्हटले आहे.
यापैकी इंडिगोच्या 6E 164 (मंगळुरु ते मुंबई (mumbai)), 6E 75 (अहमदाबाद ते जेद्दाह), 6E 67 (हैदराबाद ते जेद्दाह), आणि 6E 118 (लखनौ ते पुणे) या चार फ्लाइट्स धमक्यांमुळे प्रभावित झाल्या आहेत.
गेल्या 7 दिवसांत, भारतीय विमान कंपन्यांच्या 120 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. यातील बहुतांश धमक्या बनावी असल्याचे समोर आले आहे. नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी असे म्हटले आहे की, अशा इशाऱ्यांना हलक्यात घेतले जाऊ नये.
विमानांवरील बॉम्बच्या वाढत्या धमक्यांना तोंड देण्यासाठी सरकार सध्या कायदेशीर पावले उचलत आहे. ANI च्या वृत्तानुसार, या उपायांमध्ये अशा धमक्यांना जबाबदार असलेल्यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त, जर विमान जमिनीवर असेल तर या बदलांमुळे अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाशिवाय संशयितांना अटक करणे आणि त्यांची चौकशी करणे शक्य होईल.
मंत्री नायडू म्हणाले की विमान उद्योगाला लक्ष्य करणाऱ्या बनावी कॉलच्या वाढत्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विविध बैठका घेतल्या जात आहेत. ते पुढे म्हणाले की ते या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत आणि विमानतळावरील लोकांच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
हेही वाचा