वर्षभरात विमानतळावरून १०७ कोटींचं सोनं जप्त

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

केंद्र सरकारनं सोन्याच्या आयातीवर निर्बंध लादल्यानं मुंबई विमानतळावरील सोन्याच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे उघड झाले. सीमा शुल्क विभागानं वर्षभरात केलेल्या कारवाईत तब्बल १०७ कोटींचं सोनं हस्तगत केलं आहे. गेल्या तीन वर्षात हस्तगत करण्यात अालेलं हे सर्वाधिक सोनं अाहे.

सोन्याच्या तस्करीत वाढ

सध्याच्या अायात धोरणानुसार, कायदेशीर आयात केलेल्या कच्च्या सोन्यापैकी २० टक्के सोने पुन्हा निर्यात करणे बंधनकारक आहे. तोवर सोन्याची नवीन आयात करता येत नाही. त्यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या तुटवडा निर्माण झाला आहे. कर चुकवून भारतात आणलेल्या एक किलो सोने बाजारभावापेक्षा पाच ते सहा लाख रुपये कमी किमतीत पडते. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यात सोन्याच्या तस्करीत बरीच वाढ झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

१७८ भारतीय नागरिकांना अटक

सीमा शुल्क विभागानं मुंबई विमानतळावर विशेष मोहिमेअंतर्गत गेल्या जानेवारीत १०७ किलो सोनं जप्त केलं. विशेष म्हणजे, या सोन्याच्या तस्करीत सीमा शुल्क विभागानं आतापर्यंत १७८ भारतीय तर ४९ परदेशी नागरिकांना अटक केली आहे.

संशयास्पद हालचालींवर नजर

गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या प्रोफायलिंगवर (रूपरेषा) विशेष लक्ष ठेऊन आहोत. संशयित हालचाल, देहयष्टी, कोणत्या देशातून प्रवासी आला आहे याकडे विशेष लक्ष देऊन त्यादृष्टीने तपासात वाढ केली आहे. त्यामुळे सोन्याच्या तस्करीप्रकरणी अधिकाधिक व्यक्तींना पकडण्यात यश आल्याचं सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.


हेही वाचा -

मुंबई विमानतळावर सोनं तस्करांना ओव्हर कॅान्फिडन्स नडला!

पुढील बातमी
इतर बातम्या