पालघर साधू हत्याकांडप्रकरणी आणखी २४ जणांना अटक

पालघरमधील गडचिंचले गावात झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणी आणखी २४ जणांना अटक करण्यात आली आहे. यात पाच अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे. या मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तसेच १९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने १२ हजार पानांची दोन वेगवेगळे आरोपपत्र दाखल केले आहेत. यात २५० हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं आहे. अफवेला बळी पडल्यामुळे हा सर्व प्रकार घडला होता.

हेही वाचाः- रेस्टॉरंट आणि बार परवाना शुल्कात ५० टक्क्यांची कपात

दरम्यान, या हिंसाचारासाठी आतापर्यंत २४८ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी १०५ जणांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत १५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मंगळवारी अटक करण्यात आलेल्यांना आरोपींना बुधवारी स्थानिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना यातील १९ जणांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे वकील अमृत आधिकारी यांनी सांगितले.  मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या मुलांना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील बाल न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना रिमांड होममध्ये पाठविण्यात आलं आहे. सुरुवातीला पालघर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली होती. दरम्यान, १६ एप्रिल रोजी गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकांची हत्या केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या