Coronavirus Infected police : २४ तासात २७९ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईत अनलाँकडाऊन सुरू केल्यापासून नागरिकांबरोबर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांमध्ये ही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. अवघ्या २४ तासात महाराष्ट्र पोलिस दलातील २७९ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर आतापर्यंत या महामारीने ७० पोलिसांचा जीव घेतला आहे.

हेही वाचाः- Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील एकूण कोरोनाग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या ५४५४ वर पोहचली आहे. त्यातील १०७८ रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित पोलिसांमध्ये कोरोना विषाणूंची लक्षण ही अतिसौम्य आहेत. या माहारीने आतापर्यंत ७० पोलिस कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. त्या पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोना बाधित पोलिसांच्या आकडेवारीत कमालीची वाढ होत आहे. कोरोनाबाधित पोलिस रुग्णांमध्ये मुंबईतील पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मुंबईत पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा मोठा आहे. तसेच राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत.

हेही वाचाः- Mumbai Rains: मुंबईत पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातचं कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. रविवारी महाराष्ट्र पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर ३० जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आज महाराष्ट्र पोलिस दलातील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या