Advertisement

Mumbai Rains: मुंबईत पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा


Mumbai Rains: मुंबईत पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा
SHARES

मागील ३ दिवस मुंबईत पावसानं कहर केला. मुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं होतं. मात्र, सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी, सोमवारी मुंबई शहर व उपनगरांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा दिला आहे. त्याशिवाय, शहराच्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमी इतका असणार आहे. कुलाबा येथील प्रादेशिक हवामान खात्याकडून या काळात मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन केलं आहे. येत्या २४ तासात मुंबईतील कमाल तापमान २७ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Mumbai Rains: रस्ता कुण्याच्याही ताब्यातील असो, दुरूस्त झालाच पाहिजे- उद्धव ठाकरे

कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या अंदाजानुसार, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी घाट माथ्यावर धबधब्यांचा पाण्याचा प्रवाह वाढण्याचा आणि दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.



हेही वाचा -

इन्कम टॅक्स भरण्याची तारीख पुन्हा वाढवली, 'ही' आहे शेवटची तारीख

Mumbai Rains: रस्ता कुण्याच्याही ताब्यातील असो, दुरूस्त झालाच पाहिजे- उद्धव ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा