Advertisement

इन्कम टॅक्स भरण्याची तारीख पुन्हा वाढवली, 'ही' आहे शेवटची तारीख

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.

इन्कम टॅक्स भरण्याची तारीख पुन्हा वाढवली, 'ही' आहे शेवटची तारीख
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता इन्कम टॅक्स भरण्यासाठी शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२० आहे. इन्कम टॅक्स भरण्याची मुदत पाच महिन्याने वाढवल्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. 

शनिवारी इन्कम टॅक्स विभागानं आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवल्याची माहिती दिली. आयकर विभागाने म्हटलं की, कोरोना संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्यासाठीच्या कालावधीत मुदतवाढ केली आहे. आता आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२० करण्याचा निर्णय घेतला आहे. 


आयकर भरण्यासाठी तुम्ही आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर तुम्ही लॉग इस करुन अवघ्या काही स्टेप्स फॉलो करुन तुमचा आयकर रिटर्न फाइल करु शकता.हेही वाचा -

Amitabh Bachchan's Jalsa Bungalow ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर रक्तपात

Vasai Virar Nalasopara Containment Zones List : 'हे' आहेत वसई, विरार, नालासोपारातील कंटेन्मेंट झोन
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा