धक्कादायक! झोपेत असताना पतीने पत्नीला ट्रेनखाली ढकलले, सीसीटीव्ही व्हायरल

(Representational Image)
(Representational Image)

वसई रेल्वे स्थानकात (Vasai Railway Station) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्लॅटफॉर्म वर झोपलेल्या पत्नीला तिच्या पतीने ट्रेन खाली ढकलून दोन मुलांसोबत पलायन केले आहे. या गंभीर घटनेमुळं महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv) या घटनेचा संपूर्ण थरार कैद झाला आहे. आज सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वसई रेल्वे पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकात पत्नी झोपेत असताना पतीने तिला अचानक जागे केले. त्याचवेळी भरधाव वेगाने धावणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनखाली पतीने पत्नीला ढकलून दिले. त्यानंतर दोन्ही मुलांसोबत सदर इसमाने पलायन केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो माणूस आपल्या दोन मुलांना बॅकपॅकसह उचलून प्लॅटफॉर्मवरून पळून जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. हा माणूस नंतर दादर आणि तेथून कल्याणला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना दिसला आणि या दोन्ही रेल्वे स्थानकांवर तो दिसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे आधी भांडताना आणि नंतर मुलांसोबत प्लॅटफॉर्मवर झोपलेले दिसले. आयपीसीच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा, अधिकाऱ्याने सांगितले.


हेही वाचा

मुंबईतील ललित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी

‘हिसाब तो देना ही पडेगा….’ समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

पुढील बातमी
इतर बातम्या