‘हिसाब तो देना ही पडेगा….’ समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

समीर वानखेडे यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

‘हिसाब तो देना ही पडेगा….’ समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी
SHARES

एनसीबी मुंबईचे (NCB Mumbai) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात समीर वानखेडे यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात (Mumbai Goregaon Police) तक्रार दाखल केली आहे.

समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरून धमक्या देण्यात आल्या आहेत. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यापासून धमक्या येत आहेत. ट्विटरवर ही धमकी आल्याचं तक्रारीत सांगितलं आहे.

या प्रकरणी समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या धमकीच्या ट्विटबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे.

वानखडे यांना आरोपीने टॅग करून हा मेसेज केला होता. यावर वानखडे यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे. त्यानंतर काही तासात आरोपीने ते ट्वीट डिलिट केले. तपासात हे अकाऊंट त्याच दिवशी सुरू करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नुकतीच समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना आणखी एका प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासह इतरांनी समीर वानखेडे यांच्यावर इतर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.

समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता.

मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात आरोपांची जंत्रीच सादर करत त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच मलिक यांनी वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला.



हेही वाचा

खड्ड्यामुळे नॅशनल पार्क ब्रिजवर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

विष्णूने मुकेश अंबानींना 'अफजल' नावाने धमकावले, अटकेनंतर समोर आले सत्य

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा