खड्ड्यामुळे नॅशनल पार्क ब्रिजवर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

खड्ड्यांमुळे दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले.

खड्ड्यामुळे नॅशनल पार्क ब्रिजवर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
SHARES

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे नॅशनल पार्क ब्रिजवर खड्ड्यांमुळे अपघात झाला आहे. यामध्ये दोन दुचाकिस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. खड्डे पडल्याने दोन दुचाकीस्वार पडले. त्यांना मागून येणाऱ्या डंपरने चिरडले.

पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं आहे. दुचाकिस्वारांच्या कुटुंबियांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सध्या पावसाळ्यात पश्चिम द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुचाकिस्वारांना अक्षरश: जीव मुठित घेऊन प्रवास करावा लागत आहे.  

बोरिवली पूर्व नॅशनल पार्क हायवे ब्रिजच्या दोन्ही बाजूंच्या ऍप्रोच रोडवरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वार नॅशनल पार्कच्या पुलावरून मुंबईहून दहिसरकडे जात होते.

मोठमोठे खड्डे असल्याने दुचाकी चालकाने ब्रेक लावला. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीला मागून धडक दिली, यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच कस्तुरबा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने कस्तुरबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेतील डंपरचा MH 02 ER 5461 असा नंबर आहे. तर अपघातग्रस्त दुचाकीचा Mh 04 HL 6804 असा नंबर आहे. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. डंपरचालकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी काही प्रत्यक्षदर्शींनी केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.



हेही वाचा

येत्या 5 दिवसांत मान्सूनची तीव्रता कमी होऊ शकते -IMD

अमूल, मदर डेअरीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा