Advertisement

येत्या 5 दिवसांत मान्सूनची तीव्रता कमी होऊ शकते -IMD

आरेतील कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मागेमंगळवार, 16 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना वेठीस धरल्यानंतर, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवार, 17 ऑगस्ट रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

येत्या 5 दिवसांत मान्सूनची तीव्रता कमी होऊ शकते -IMD
(File Image)
SHARES

राज्यात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत पुढील दोन ते तीन तास अधूनमधून तीव्र पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट आणि आसपासच्या कोकणातील काही भाग पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता आहे.

आज सकाळपासून मुंबईसह कोकणात आणि विदर्भासह मराठवाड्यात चांगला पाऊस कोसळत आहे. राज्यात प्रामुख्याने कोकणसह पालघर, नंदुरबार, नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव पुढील तीन ते चार तासांसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असताना विदर्भ, मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात पावसाचा जोर (Rain Intensity) ओसरला होता. मात्र राज्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे.

तर राज्यात अनेक भागांत हलक्या सरी ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हवामान विभागाने सातारा आणि पुणे जिल्ह्यात उद्या सकाळपर्यंत जोरदार पावसाचा अलर्ट (Rain Alert) जारी केलाय. तर संपूर्ण विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाचा अलर्ट दिलाय.



हेही वाचा

आरेतील कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मागे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा