Advertisement

आरेतील कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मागे

मुंबई मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरेतील कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मागे
SHARES

आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. तांत्रिक बाब पूर्ण झाल्यामुळे आता कारशेडचं काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुंबईतील आरे जंगलात मेट्रो कारशेडला मुंबईकर, पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. मेट्रो कारशेड हे इतरत्र ठिकाणी तयार करण्याची मागणी करण्यात आली होती.

मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणी बिबट्यांचा अधिवास असून जैवविविधता असल्याचे पर्यावरणवाद्यांनी म्हटले होते. आरेमधील बांधकामामुळे जंगलच नव्हे तर इथे असलेल्या जैवविविधतेवरही परिणाम होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला स्थगिती देत कांजूर येथील जागेसह इतर पर्यायांवर विचार सुरू केला. कांजूर येथील जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे.

मागील महिन्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या नव्या सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर मागील काही रविवारपासून मुंबईकर आणि पर्यावरण प्रेमींकडून या निर्णयाला विरोध करण्यात येत आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा