Advertisement

अमूल, मदर डेअरीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ

नवीन दर आजपासून लागू झालेत.

अमूल, मदर डेअरीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ
SHARES

अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ केली आहे. कंपन्यांची यंदाची ही दुसरी दरवाढ आहे. नवीन दर 17 ऑगस्टपासून लागू होतील.

अमूल गोल्ड ३१ रुपये ५०० मिली, अमूल फ्रेश २५ रुपये ५०० मिली आणि अमूल शक्ती २८ रुपये ५०० मिली. 2 रुपये प्रति लिटरची वाढ म्हणजे एमआरपीमध्ये 4 टक्के वाढ होते जी अन्नधान्याच्या सरासरी महागाईपेक्षा कमी आहे.

अमूलने यावर्षी फेब्रुवारीमध्ये दरात वाढ केली होती. यानंतर अमूल गोल्ड मिल्कची किंमत 30 रुपये प्रति 500 मिली, अमूल ताझा 24 रुपये प्रति 500 मिली आणि अमूल शक्ती 27 रुपये प्रति 500 मिली.

दुधाचा एकूण खर्च आणि उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. अमूलने सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत एकट्या पशुखाद्याचा खर्च सुमारे 20 टक्क्यांनी वाढला आहे. मदर डेअरीने मार्च महिन्यात दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती.

कंपनीच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, 17 ऑगस्ट 2022 पासून त्याच्या द्रव दुधाच्या किमती प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवणे भाग पडले आहे. नवीन दर सर्व प्रकारच्या दुधासाठी लागू असतील. फुल क्रीम दुधाचे दर बुधवारपासून प्रतिलिटर 59 रुपयांवरून 61 रुपयांपर्यंत वाढणार आहेत.



हेही वाचा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर

कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, मुंबईतील रूग्णांच्या संख्येत 80 टक्के वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा