Advertisement

कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, मुंबईतील रूग्णांच्या संख्येत 80 टक्के वाढ

बुधवारी मुंबईत कोरोनाचे ८५२ रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, मुंबईतील रूग्णांच्या संख्येत 80 टक्के वाढ
SHARES

कोरोना रूग्णांच्या (Covid-19) संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विशेषत: मुंबई आणि दिल्लीत हा धोका पुन्हा वाढला आहे. मुंबईमध्ये बुधवारी (10 ऑगस्ट) 852 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एक जुलैनंतरची ही सर्वाधिक दैनिक रुग्णसंख्या आहे. तसंच, बुधवारी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूचीही नोंद झाली.

एक जुलै 2022 रोजी मुंबईत 978 नव्या कोरोनाबाधितांची, तसंच दोघांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईतल्या कोरोनाबाधितांच्या दैनिक नव्या रुग्णसंख्येत हळूहळू घट होत गेली. मात्र ऑगस्ट महिन्याचे पहिले दोन दिवस वगळता नंतर दररोज किमान 400 नवे कोरोनाबाधित मुंबईत आढळत आहेत.

9 ऑगस्टला 476 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 24 तासांत त्या संख्येत 79 टक्के वाढ नोंदवली गेली. 10 ऑगस्ट रोजी 852 नवे कोरोनाबाधित मुंबईत आढळले.

10 ऑगस्टच्या या नव्या 852 रुग्णांपैकी केवळ 36 रुग्णांना लक्षणं दिसत असून, 816 जणांना कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. या 24 तासांत मुंबईत 9670 कोरोना चाचण्या केल्या गेल्या. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या एक कोटी 79 लाख 4 हजार 139 एवढी झाली आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ नोंदवली जात असल्याचं यावरून दिसून येतं. मुंबईत सध्या सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) अर्थात उपचार सुरू (Active Corona Patients) असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 3545 झाली असल्याचं बृहन्मुंबई महापालिकेच्या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.



हेही वाचा

सेव्हन हिल्स रुग्णालय कर्करोग रुग्णालय म्हणून सुरू करा, भाजप आमदाराची मागणी

Monkeypox Guidelines : मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा