Advertisement

सेव्हन हिल्स रुग्णालय कर्करोग रुग्णालय म्हणून सुरू करा, भाजप आमदाराची मागणी

यासंदर्भात त्यांनी एक पत्र महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहले आहे.

सेव्हन हिल्स रुग्णालय कर्करोग रुग्णालय म्हणून सुरू करा, भाजप आमदाराची मागणी
SHARES

सध्या कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकमेव टाटा रुग्णालय असून सर्व सामान्य गरीबांना या रुग्णालयांमध्ये दाखल होताना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सेव्हन हिल्स रुग्णालय कर्करोग रुग्णालय करण्याची मागणी भाजप आमदाराने केली आहे. 

अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय (seven hills hospital) कर्करोग रुग्णालय म्हणून सुरू करावे, अशी मागणी भाजप आमदार अमित साटम (amit satam) यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र महापालिका (bmc) आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहले आहे.

2004च्या ठरावानुसार महापालिकेच्या भूखंडावर 1300 खाटांचे कर्करोग आणि मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधून चालविण्यास सदर कंपनीला दिल होते. यापूर्वीही या जागेवरील अर्धवट वास्तू उभारण्यात आली होती. त्यामागेही कर्करोग रुग्णालय बांधणे हाच मूळ हेतू होता, याकडे अमित साटम यांनी पालिका आयुक्तांचं लक्ष वेधलं आहे.

कोविड काळात महापालिकेने हे रूग्णालय महापालिकेने ताब्यात घेतले होते. मागील काही महिन्यांपासून मुंबईतील कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आता आठ कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे, असं साटम या पत्रात म्हणतात.

काही कोविड सेंटर बंद करण्यात आले असले तरी आताही सेव्हन हिल्स हे कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पंरतु ज्या हेतून सेव्हन हिल्स कंपनीला हे रुग्णालय चालवण्यास दिले होते. त्याच हेतूप्रमाणे सदर रुग्णालय महापालिकेने स्वत: चालवणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, 2004च्या ठरावानुसार महापालिकेच्या भूखंडावर 1300 खाटांचे कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रूग्णालय बांधून चालविण्यास सदर कंपनीला दिले होते. यापूर्वीही या जागेवरील अर्धवट वास्तू उभारण्यात आली होती. त्यामागेही कर्करोग रुग्णालय बांधणे हाच मूळ हेतू होता. आता सेव्हन हिल्स रुग्णालयाची वास्तू पूर्णत: बांधून तयार आहे. तसेच यासाठी लागणारे मनुष्यबळही उपलब्ध आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे रुपांतर कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने त्याप्रमाणे निर्णय घेत कार्यवाही करावी आणि जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही साटम यांनी केली आहे.

रुग्णालयामध्ये कॅथ लॅब, रेडिएशन थेरेपी, न्यूक्लियर मेडिसीन, नेप्रोलॉजी एन्डोक्रीनॉलॉजी, न्युअलॉजी आदी प्रकारच्या आरोग्य विषयक सेवा सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कर्करोग, हृदयविकार, किडनी, मेंदू, डायबेटीज, थायरॉईड आदी गंभीर आजारांवर यामुळे उपचार करता येवू शकतो. तसंच महापालिकेने केईएम, शीव, नायर व कूपरच्या धर्तीवर सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविदयालयासह कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.हेही वाचा

Monkeypox Guidelines : मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

H1N1 Outbreak: स्वाईन फ्लूची प्रकरणांमध्ये वाढ, BMC ची नवी नियमावली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा