झाड अंगावर कोसळून एकाचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

साकिनाक्यात मागच्या वर्षी झाड अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा याच घटनेची पुनरावृत्ती दादरमध्ये गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत दिनेश सनगले यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपचारादरम्यान मृत्यू

दिनेश सनगले हे दादर पुर्वेकडील नायगाव कामगार वसाहतीतील रहिवासी आहेत. दुपारच्या जेवणासाठी सनगले त्यांच्या घरी जात असताना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथून जात असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने भोईवाडा पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण केलं. दरम्यान सनगले यांना उपचारासाठी तातडीने परळच्या केईएम रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या