Advertisement

चेंबूरमध्ये झाड अंगावर पडून महिलेचा मृत्यू


चेंबूरमध्ये झाड अंगावर पडून महिलेचा मृत्यू
SHARES

चेंबूर परिसरात झाड अंगावर पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शारदा घोडेस्वार असं या महिलेचं नाव असून ती पांजरपोळ येथे राहणारी आहे.घरकाम करणाऱ्या शारदा गुरुवारी सकाळी काम आटोपून चेंबूर येथील डायमंड गार्डन जवळ बसची वाट पहात उभ्या होत्या. याच वेळेस अचानक त्यांच्या अंगावर झाड पडलं. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून यामागे नेमकी चूक कुणाची आहे? याची चौकशी सुरु आहे.
याअाधी देखील चेंबूर परिसरात एक महिला माॅर्निक वाॅक करत असताना तिच्या अंगावर नारळाचं झाड पडून तिचा मृत्यू झाला होता.

संबंधित विषय
Advertisement