ओला, उबरच्या आंदोलनात चालकाला मारहाण, ४ जणांना अटक

ऑनलाइन टॅक्सीचे भाडे किमान १०० ते १५० रु. असावे, प्रति किमीमागे १८ ते २३ रु. भाडे असावे, कंपनीने ताफ्यात नवीन गाड्या बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे या मागण्यांसाठी अोला, उबरच्या चालक-मालकांचा गेल्या आठ दिवसांपासून संप सुरू आहे. मात्र, संपादरम्यान आंदोलकांनी एका ओला चालकाला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाऊसाहेब ससाणे, आश मोहम्मद शहा, अशोेक शर्मा आणि अमन शेख या चार जणांना अटक केली आहे.

संपकऱ्यांनी केली मारहाण

संताजी पाटील असं या ओला चालकाचं नाव असून हा शुक्रवार २६ ऑक्टोबर रोजी पुण्याहून मुंबईत प्रवासी सोडण्यासाठी आला होता. त्यावेळी या चालकाला संपात सहभागी झालेल्या आंदोलकांनी भांडुप येथील अमरनगर भागातील एका कार्यालयात नेऊन मारहाण केली.

व्हिडिओतून दिला 'हा' संदेश

या चालकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ त्यांनी काढला असून त्या व्हिडिओमध्ये संपात सामील न होणाऱ्या चालकाची अशीच हालत करण्यात येईल, असा संदेश देण्यात आला आहे. याप्रकरणी रविवारी त्या चालकाला मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.


हेही वाचा - 

ओला-उबर चालक संपावर, प्रवाशांचे हाल

पुढील बातमी
इतर बातम्या