महाराष्ट्राच्या कारागृहातील ४०८ कैद्यांची कोरोनावर मात

राज्याच्या कारागृहांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवेसंदिवस वाढत असल्याच्या बातम्या पुढे येत असताना, कारागृहातील एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारागृहातील ४०८ कैद्यांनी  कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. सध्या कारागृहातील २३४ कोरोनाबाधिक कैद्यांवर उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचाः- भानुशाली दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा १० वर

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्चन्यायलयाने राज्य सरकारकडे जैलमधील कैद्यांबाबत विचारपूस केली होती. त्यात त्यांनी जेलमधील कैद्यांमध्ये कोरोना संसर्ग आहे का? अशी विचारणा केली होती. कोरोना प्रादर्भाव वाढु लागल्याने, याचा संसर्ग कारागृहातील कैद्यांना बसू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहातुन तब्बल ११ हजारहून अधिक कैद्यांची प्रशासनाने टप्या टप्याने सुटका केली. कारागृहात कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करुन त्यांना सोडण्यात आले. तर काही कारागृहात थर्मल टेम्परेचरच्या सहाय्याने कैद्यांची चाचणी करुन त्यांना सोडण्यांस आले. सर्वाच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर सरसकट कैद्याना बाहेर न सोडता त्यांच्याकडून जामिनपत्र लिहुन घेतले जात आहे. त्यानुसार, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल व्यवस्थित असेल अशाच कैद्याना जामीनावर बाहेर सोडले जात आहे.

हेही वाचाः- Ganesh Festival 2020: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात चेकपोस्ट तयार, दीड लाख लोकं येण्याची शक्यता

राज्य कारागृतून मिळालेल्या माहितीनुसार ६४२ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४०८ कैद्यांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या कारागृहात २३४ कैद्यांवर उपचार सुरु असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे, कोरोनावर उपचार घेत असलेल्या  तुरुंगातील २०६ कर्मचाऱ्यांपैकी १५६ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल जेलमध्ये १८१ कैदी आणि ४४ जेल कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली होती. तर पुण्याच्या येरवडा जेल मध्ये, नागपूर मध्यवर्ती तुरुंगात सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ गुन्ह्यातील अनेक कैद्यांना सोडून देण्यात आले होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टंन्सिग राखण्याच्या दृष्टीने तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले होते. तुरुंगातील क्षमता पाहून काही ठिकाणी कैद्यांना हलवण्यात आले होते. 

पुढील बातमी
इतर बातम्या