Advertisement

भानुशाली दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा १० वर


भानुशाली दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा १० वर
SHARES

मुंबईच्या सीएसएमटी परिसरात ५ मजली भानुशाली इमारतीचा काहीसा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ही इमारती कोसळली असून, अद्याप बचावकार्य सुरूच आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास मृतांचा आकडा १० वर गेल्याची माहिती समोर आली आहे.

कुसुम पद्मलाल गुप्ता (४५), ज्योत्सना पद्मलाल गुप्ता (५०), पद्मलाल मेवालाल गुप्ता (५०), किरण धीरज मिश्रा (३५), मनिबेन नानजी फारिया (६२), शैलेश भालचंद्र कानडू (१७), प्रदिप चौरासिया (३५), रिकु चौरासिया (२५), कल्पेश नाझी तरिया (३२) अशी ९ मृतांची नावे असून, एका मृताची ओळख पटलेली नाही. तर २ जण जखमी झाले असून, नेहा गुप्ता आणि भालचंद्र कानडू अशी जखमींची नावे आहेत. नेहाची यांची प्रकृती चिंताजनक असून, भालचंद्र किरकोळ जखमी झाले आहेत.

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले होते. ८ फायर इंजिन, २ रेस्क्यू व्हॅनच्या मदतीने शोधकार्य सुरु होते.

या व्यतीरिक्त ५० कामगार, ६ जेसीबी, १० डंपर्स घटनास्थळी कार्यरत होते दरम्यान गुरुवारी रात्री ऊशिरापर्यंत मदत कार्य सुरु असतानाच येथे अग्निशमन दलाचे जवान दाखल होण्यापूर्वी २ जण सुखरुप यातून बाहेर पडली. अग्निशमन दलाने इमारतीच्या दुस-या भागात अडकलेल्या १३ जणांना सुखरुप बाहेर काढले. तर ढिगा-यातून ९ जणांना बाहेर काढण्यात आले. हेही वाचा -

Exclusive खळबळजनक! विलगीकरणातून कोरोनाची लक्षणे असलेल्या आरोपींचे पलायन

दिवसभरात ५५२७ जणांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्केRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा