जुईनगरमध्ये तलावात उडी मारून महिलेची आत्महत्या

नवी मुंबईतील जुईनगर येथील चिंचोली तलावात एका महिलेनं उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. प्रतिभा रामचंद्र गायकवाड (४५) असं या महिलेचं नाव आहे. आजाराला कंटाळून या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती नेरुळ पोलिसांनी दिली.

नेरुळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा गायकवाड यांनी बुधवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास चिंचोली तलावात उडी मारून आत्महत्या केली. प्रतिभा या नेरूळ सेक्टर ८ मधील श्रमसाफल्य इमारतीत राहत होत्या. 

प्रतिभा मागील वर्षभरापासून क्षयरोगाच्या आजाराने त्रस्त होत्या. या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.


हेही वाचा-

२२ वर्षानंतर थापा टोळीतील गुंडाला अटक

मुन्ना झिंगाडा भारतीयच, छोटा राजनचा जबाब आला कामी


पुढील बातमी
इतर बातम्या