• मुन्ना झिंगाडा भारतीयच, छोटा राजनचा जबाब आला कामी
  • मुन्ना झिंगाडा भारतीयच, छोटा राजनचा जबाब आला कामी
SHARE

छोटा राजनच्या जबाबामुळेच दाऊदचा हस्तक मुन्ना झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचा निर्णय थायलंड न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मुन्ना झिंगाडाचा ताबा लवकरच भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळू शकणार आहे. मुंबईतील जोगेश्वरी इथं राहणाऱ्या झिंगाडावर भारतात ७० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.


ताब्यासाठी रस्सीखेच

छोटा राजनवर बँकॉकमध्ये हल्ला करणारा छोटा शकीलचा मुख्य हस्तक आणि दाऊद इब्राहिमचा विश्वासू मुन्ना झिंगाडा याचा ताबा मिळवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील अनेक वर्षांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती.'आयएसआय'ची खेळी

दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील पाकिस्तानात असून 'आयएसआय'च्या छत्रछायेखाली आहेत. छोटा राजनवर बँकॉकच्या हॉटेलमध्ये हल्ला करणाऱ्या मुन्नालाही आपल्या छत्राखाली आणण्यासाठी 'आयएसआय'ने ही चाल खेळल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. 'आयएसआय'ने एका अज्ञात व्यक्तीमार्फत पाकिस्तानी पासपोर्ट मुन्नापर्यंत पोहोचवला. त्याच्याच आधारावर मुन्नाने तो पाकिस्तानी असल्याचा दावा केला.


मुंबई पोलिसही हतबल

मुन्ना हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा खोटा असल्याचं सिद्ध करण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्याच्यावरील विविध गुन्ह्यांची कागदपत्रे सादर केली खरी, मात्र पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी बनावट कागदपत्रांद्वारे केलेल्या खेळीपुढं ती टिकू शकली नाही.छोटा राजनचा जबाब

दरम्यान बँकाक इथं कुख्यात गुंड राजन निकाळजे उर्फ छोटा राजन याच्या अटकेनंतर अनेक नवनवीन खुलासे पुढे आले. राजनच्या जबाबामुळे झिंगाडा भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध झाल्यानंतर झिंगाडाला आणण्यासाठीच्या सुरक्षा यंत्रणांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.


जबाबात पूर्ण तपशील

झिंगाडा भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध करण्यासाठी छोटा राजन विरोधातील आरोपपत्राची मदत घेणार आली. या आरोपपत्रामध्ये दाऊद आणि झिंगाडाचे संबंध, २००१ मध्ये राजनवर झिंगाडाने केलेला हल्ला आणि मुंबईतील झिंगाडाचं वास्तव्य याबाबत सविस्तर माहिती राजनने आपल्या जबानीत दिली होती. पाकिस्तानने हा सर्व बनाव असल्याचं दाखवत झिंगाडाचा ताबा थायलंड न्यायालयाकडे मागितला होता.

राजनच्या आरोपपत्रातील संवाद आणि भारतातील झिॆगाडाच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाचा आधार घेत थायलंड न्यायालयाने पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे झिॆगाडाचा ताबा मिळवणण्यासाठी भारताने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत.हेही वाचा-

डोंबिवलीतील सख्ख्या भावांचं मलेशियात अपहरण, १ कोटींच्या खंडणीची मागणी

पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या बनावट लेटरहेडद्वारे बदनामीसंबंधित विषय
ताज्या बातम्या