डोंबिवलीतील सख्ख्या भावांचं मलेशियात अपहरण, १ कोटींच्या खंडणीची मागणी

डोंबिवलीतील रोहन वैद्य (३६) अाणि कौस्तुभ वैद्य (३१) या सख्ख्या भावांचं मलेशियात अपहरण करण्यात अाल्याचं समोर अालं अाहे.

डोंबिवलीतील सख्ख्या भावांचं मलेशियात अपहरण, १ कोटींच्या खंडणीची मागणी
SHARES

डोंबिवलीतील दोन सख्ख्या भावांचं मलेशियामध्ये अपहरण करण्यात अाल्याची धक्कादायक घटना समोर अाली अाहे. अपहरणकर्त्यांनी १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती या तरूणांच्या कुटुंबियांनी दिली अाहे.  हे दोघे भाऊ १ अाॅगस्ट रोजी व्यवसायाच्या कामानिमित्त दुबईला गेले होते.


दुतावासाची मलेशियात तक्रार

अपहरण झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मलेशियातील भारतीय दुतावास तसंच ठाणे अाणि डोंबिलली पोलिसांशी संपर्क करून मदत मागितली अाहे. याप्रकरणी भारतीय दुतावासाने मलेशियात तक्रारही दाखल केली अाहे.  


ऑर्डर घेण्यासाठी मलेशियात 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन वैद्य (३६) अाणि कौस्तुभ वैद्य (३१) हे दोघे भाऊ मुंबईत मासे निर्यात करणारी रॉक फ्रॉजन फूड नावाची कंपनी चालवतात. व्यवसायानिमित्त ते वारंवार परदेशी दौरा करत असतात. दोघेही मलेशियामध्ये मिस ली फ्रोजन फूट्स कंपनीकडून ऑर्डर घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले अाहेत. त्यांच्या कुटुंबियांकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात अाली अाहे.


जीवे मारण्याची धमकी

या तरुणांचे काका राजीव वैद्य यांनी याबाबत सांगितलं की, दोघा भावांनी अापले वडील प्रकाश यांना फोन करून काही लोकांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती दिली. जर १ कोटी रुपयांची खंडणी नाही दिली तर ते लोक अाम्हाला मारून टाकतील, असंही रोहन अाणि कौस्तुभ यांनी सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी २ अाॅगस्टला रात्री साडेअकरा वाजता डोंबिवली पोलिस स्थानकात या घटनेची माहिती दिली. 



हेही वाचा -

पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या बनावट लेटरहेडद्वारे बदनामी

चेंबूरमध्ये आगीत होरपळून वृद्ध महिलेचा मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा