चेंबूरमध्ये आगीत होरपळून वृद्ध महिलेचा मृत्यू


चेंबूरमध्ये आगीत होरपळून वृद्ध महिलेचा मृत्यू
SHARES

चेंबूरच्या टिळक नगर परिसरातील अमरदीप इमारतीत एका फ्लॅटला दुपारी आग लागली. या आगीत लीला नायर या वृद्ध महिलेचा जळून मृत्यू झाला. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


कधी घडली घटना?

चेंबूरच्या टिळक नगर परिसरातील अमरदीप इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मृत लीला नायर त्यांच्या मुलीसोबत रहात होत्या. मंगळवारी सकाळी नायर यांची मुलगी कामावर गेल्यानंतर लीला नायर घरी एकट्याच होत्या. त्यावेळी घरातील किचनमध्ये अचानक आग लागली. क्षणार्धात ही आग घरभर पसरली. या आगीत लीला नायर गंभीररित्या होरपळल्या. आगीची माहिती शेजाऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी त्वरीत अग्नीशमन दलाला बोलवलं.


उपचारादरम्यान मृत्यू

अग्निशमन दलाच्या जवानांनी नायर यांना १०८ या शासकीय रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान नायर यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



हेही वाचा-

बोरिवलीत तरुणीची आत्महत्या

नोकरीच्या अामिषानं ४ लाखांना गंडवलं


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा