बोरिवलीत तरुणीची आत्महत्या


बोरिवलीत तरुणीची आत्महत्या
SHARES

बोरिवलीत एका २१ वर्षीय तरुणीनं राहत्या घरातील किचनच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिखा विट्ठल शेट्टी (२१) असं या तरुणीचं नाव आहे. मात्र शिखाच्या आत्महत्येचं कारणं अद्याप समजलेलं नसून कस्तुरबा पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. शिखाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.


मध्यरात्री घटना

शिखा बोरिवली पूर्व येथील राजेंद्र नगर परिसरातील एकता भूमी सोसायटी या इमारतीतील १६ व्या मजल्यावर आपल्या कुटुंबासोबत राहत होती. सोमवारी रात्रीच्या सुमारास शिखानं आत्महत्या केल्याचं समजतं. मात्र, शिखाने अात्महत्या केल्याची माहिती कुणालाच नव्हती. मात्र, पहाटे ४ वाजता इमारतीमधील एका रहिवाशाने शिखाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पाहिला आणि आरडाओरड केली. त्यावेळी शिखाच्या कुटुंबियांसोबत इमारतीमधील सर्व रहिवाशी त्या ठिकाणी आले.



हेही वाचा -

नोकरीच्या अामिषानं ४ लाखांना गंडवलं

विरार स्थानकात सापडले जीवंत काडतूस?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा