बनावट नोटांची छपाई पाकच्या टाकसाळीत, चेंबूरमधून माजी नगरसेविकेच्या नवऱ्याला अटक

मुंबईच्या गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात बनावट भारतीय नोटांची तस्करी करणारे मोठं रॅकेट उघडकीस आणलं होतं. गुन्ह्यांचं गांभीर्य ओळखून हा तपास पुढे NIA सोपवण्यात आला. नुकतीच या गुन्ह्यांत NIAने अकबर हुसैन ऊर्फ राजू बटला(४७) याला अटक केली आहे. विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या सर्व बनावट नोटा या पाकिस्तानच्या सरकारी छापखान्यात छापण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २३ लाखांच्या बनावट जप्त केल्या होत्या, हे पैसे दुबईमार्गे आणण्यासाठी आरोपींना बटलाने मदत केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर NIAने बटलाला अटक केली. बटला सध्या NIA च्या न्यायालयीन कोठडीत आहे.

हेही वाचाः- जेट एअरवेज घेणार पुन्हा भरारी

 ट्राँम्बेच्या चित्ता कॅम येथील पावलीपाडा परिसरात बटला राहतो. समाजसेवेच्या नावाखाली आतापर्यंत तो अनेक चुकीचे धंदे करत आला. नुकतीच बटलाला रायगड येथील फार्म हाऊसवर रक्तचंदनाची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल दोन डझन गुन्ह्यांची नोंद आहे. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मारण्याचा कट रचल्याप्रकरणी त्याला यापूर्वी अटक झाली होती. मात्र डोक्यावर वरद हस्त आणि कायद्यातील पळवाटा शोधत बटलाला जामीन मिळाला. राहत्या परिसरातून त्याने विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र त्याचा पराभव झाला.  तर त्याची पत्नी ही परिसरातील माजी नगरसेविका होती. काही दिवसांपूर्वी  राज्याच्या एका बड्या नेत्यासोबतच्या फोटोवरून बटला चांगलाच चर्चेत आला होता. समाजसेवेच्या पडद्याआड बटलाने अनेक गुन्हे आतापर्यंत करत आला होता. मात्र आताच्या गुन्ह्यात बटलाचा पाय चांगलाच खोलात गेला.

हेही वाचाः- ‘नो मराठी’, ‘नो अॅमेझाॅन’, मनसे पुन्हा आक्रमक

मुंबईच्या गुन्हे शाखा ९ चे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या पथकाने बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस आणलं होतं, या गुन्ह्यात पोलिसांनी जावेद गुलामनबी शेख याला अटक केली होती. त्याच्याकडून दोन हजार रुपयांच्या ११९३ (२३ लाख ८६ हजार रुपये किंमतीच्या) बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. टॉलीमध्ये गुप्त जागा बनावून त्यात उशीमध्ये लवपून या नोटा आणण्यात आल्या होत्या. जप्त करण्यात आलेल्या नोटा उच्च प्रतिच्या आहेत. ख-या नोटा व या नोटांमधील फरक ओळखता येत नसून या नोटा पाकिस्तानातून आणण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर हा गुन्हा पुढे NIA कडे वर्ग करण्यात आला.  जावेदच्या चौकशीत त्याने बटलाच्या सांगण्यावरून दुबईला जाऊन त्या नोटा आणल्याची कबूली दिली होती.

हेही वाचाः- CBSE board exam: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्येच?

या नोटा पाकिस्तानच्या सरकारी छापखान्यात छापण्यात आल्या असल्याचा अंदाज होता. पाकिस्तानमधून त्या दुबईला आणि दुईहून त्या भारतात आणण्यात आल्या होत्या. या व्यवहारात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक सरदार नावाच्या व्यक्तीने हा सर्व व्यवहार केला होता. त्यानुसार बटलाच्या सांगण्यावरून जावेद दुबईला गेला. त्याचा पासपोर्ट आणि व्हिजाची व्यवस्थाही बटलाने केली होती. हे निष्पन्न झाल्यानंतर नुकतीच NIA ने बटला विरोधात भादंवि कलम ४८९(अ), ४८९(क), १२०(ब) व ३४ सह युएपीएस कायदा १९६७ कलम १५(१)(अ)( व १६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या