Advertisement

CBSE board exam: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्येच?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE)च्या दहावी-बारावीच्या परीक्षा येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यावर मंडळ ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

CBSE board exam: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्येच?
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE)च्या दहावी-बारावीच्या परीक्षा येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यावर मंडळ ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सोबतच या परीक्षा कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून आॅनलाईन नव्हे, तर आॅनलाईन पेपर पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत.

जसजसं नवीन शैक्षणिक वर्ष जवळ येऊ लागलं आहे, तसतसं विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची चिंता सतावू लागली आहे. आधीच कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग भरू शकले नाही. सर्व अभ्यास हा आॅनलाईन पद्धतीनेच करण्यात येत आहे. त्यातच अनेकदा महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने सर्वांनाच त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्याची CBSE ची मानसिकता नसल्याचं म्हटलं जात आहे. परीक्षांची तारीख निश्चित नसली, तरी त्यावर अद्याप चर्चा सुरू आहे.

विद्यार्थी-शिक्षकांना सगळ्यात मोठी चिंता सतावत आहे ती प्रॅक्टीकल एक्झामची. कारण शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रॅक्टीकलचे वर्ग देखील झालेले नाहीत. १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकलचे ३० गुण द्यावे लागतात. प्रॅक्टीकल परीक्षा घेता न आल्यास दुसरा कुठला तरी पर्याय शोधून काढावा लागेल.  

हेही वाचा- ११वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर

राज्यात देखील SSC आणि HSC च्या परीक्षा या आॅनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येतात. परंतु कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मध्यंतरी परीक्षा पुढं ढकलाव्या लागल्याने बोर्डाच्या परीक्षा एप्रिल-मे पर्यंत कुठल्याही परिस्थितीत घेण्यात येतील, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. 

शहरातील कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शहर-उपनगरातील सर्व शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. कोरोनाचं संकट टाळण्याच्या उद्देशाने राज्यातील स्थानिक परिसरातील शाळा सुरू करायच्या किंवा नाही, याचा निर्णय पूर्णपणे स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आल्याची माहिती देखील काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी दिली होती. 

त्यानुसार सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी इयत्तेच्या परीक्षा या ठरलेल्या वेळेत आणि बहुतांश आॅफलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील, असं दिसून येत आहे. फक्त सध्याच्या स्थितीत या शिक्षण मंडळांकडून परिस्थितीचा आढावा घेत चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीकोनातून कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यास झटपट परीक्षा घेऊन मोकळं होण्याकडेच या शिक्षण मंडळाचा कल आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रणजितसिंह डिसले यांचा सत्कार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा