Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रणजितसिंह डिसले यांचा सत्कार


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रणजितसिंह डिसले यांचा सत्कार
SHARES

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या तर्फे दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार डिसले यांना मिळाल्याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. शिवाय डिसले यांच्यासारखे शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचं शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

डिसले यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसून त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर ९ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेलं कार्य हे ध्येयवेडाचं उदाहरण आहे. रणजितसिंह डिसले यांची शिक्षणक्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते. 

कोविडनंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती, याच धर्तीवर कोविडनंतरचं शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपूर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावं, असंही उद्धव ठाकरे यांनी सुचवलं.

डिसले सरांनी शैक्षणिक क्षैत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राचं नाव देशातच नव्हे, तर साऱ्या जगभर पोहचविणाऱ्या रणजितसिंह डिसले सरांच्या कार्याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काढले.

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधून जास्तीत जास्त तंत्रस्नेही व सृजनशील शिक्षक निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार अशी भावना सत्कार समारंभाला उत्तर देताना रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केली.

सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले सरांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

global teacher award winner ranjit singh disle facilitated by maharashtra cm uddhav thackeray


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा