Advertisement

११वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर

११वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर झाली असून, ३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही यादी जाहीर झाली आहे.

११वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर
SHARES

११वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर झाली असून, ३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही यादी जाहीर झाली आहे. या यादीत मराठा प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण लागू न करता या विद्यार्थ्यांना खुल्या गटात सामावून घेण्यात आले आहे. परिणामी मुंबई महानगर परिसरात दुसऱ्या फेरीचं पात्रता गुण पहिल्या फेरीच्या तुलनेत साधारण ५ गुणांनी वाढलं आहेत.

या फेरीत ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहे. अर्ज केलेले ७९ हजार ५७९ अद्यापही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. ११वीची पहिली फेरी झाल्यानंतर मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती आल्यामुळं प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मराठा प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या गटात सामावून घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर तब्बल ३ महिन्यांनंतर ११वीची दुसरी फेरी झाली.

या फेरीसाठी १ लाख ५५ हजार ८१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ७६ हजार २३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही या फेरीत घटली आहे. या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असून हे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत.

दुसऱ्या फेरीतील प्रवेश पात्रता गुणांची टक्केवारी (कंसात पहिल्या फेरीचे गुण)

 • एचआर  – वाणिज्य : ९४ (९३.८)
 • केसी  – कला : ८९.८ (९०.२)  वाणिज्य : ९२.२ (९२.२)  विज्ञान : ९० (८९.४ )
 • जय हिंद  – कला : ९२.८ (९२.६)  वाणिज्य : ९२.८ (९२.६)   विज्ञान : ८९.२ (८९.४)
 • रुईया – कला : ९४ (९४.२) विज्ञान: ९४.८ (९४.८)
 • पोद्दार – वाणिज्य : ९४.२ (९४.२).
 • रुपारेल – कला : ८९.२ (९१.२)  वाणिज्य : ९१.६ (९२)  विज्ञान : ९२.८ (९३.४).
 • साठ्ये – कला : ८१.८ (८५.८)  वाणिज्य : ९०.४ (९१) विज्ञान :  ९१.२ (९२.८).
 • डहाणूकर – वाणिज्य : ९१.६ (९२.४).
 • भवन्स – कला : ८१.४ (८४.४) वाणिज्य : ८९.२ (९०.६)  विज्ञान : ८८.६ (९०.२).
 • मिठीबाई – कला : ८९.२ (८९.४)  वाणिज्य : ९१.६ (९१.८)   विज्ञान : ८९.२ (८९.८).
 • एनएम  – वाणिज्य : ९५.२ (९४).
 • वझे-केळकर – कला : ९१ (९१.६)  वाणिज्य : ९३.६ (९३.६)   विज्ञान : ९३.८ (९४.४).
 • झेविअर्स – कला : ९४.६ (९४.६)  विज्ञान : ९०.६ (९१.४).

शाखानिहाय पसंतीक्रमानुसार विद्यार्थी संख्या

पसंती
कला
वाणिज्य
विज्ञान
एमसीव्हीसी
पहिला
२,९८२
१०९४४
५९५७
५४२
दुसरा
१४०२
६९५६
३९०३
५४
तिसरा
८६६ 
६१३३ 
२७५१ 
१०
चौथा
६३९
५३७४
२४२८

पाचवा
५२१
४५९७
१९१९ 
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा