चौकशीला येण्यापूर्वी अभिनेता अर्जुन रामपालने NCB कडे मागितला वेळ

अभिनेता अर्जून रामपालने चौकशीला उपस्थीत राहण्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे(एनसीबी) 22 डिसेंबरपर्यंतचा वेळ मागितला आहे. एसीबीने अर्जून रामपालला समन्स पाठवून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते.

हेही वाचाः-जेईई मेन्स परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

बॉलीवूडमधील तारकांना ड्रग्स पुरवणा-यांबाबत तपास करणा-या एनसीबीच्या हाती काही नवीन पुरावे लागले आहेत त्याची पडताळणी करण्यासाठी रामपालची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. पण रामपालने त्यासाठी २२ डिसेंबरपर्यंतचा वेळ मागितला आहे. यापूर्वी अर्जुन रामपालची याप्रकरणी सात तास चौकशी करण्यात आली आहे. त्याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स  हिची एनसीबीने दोनवेळा चौकशी केली होती. त्यापूर्वी अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. त्यात प्रतिबंधीत गोळ्या सापडल्या होत्या. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने व चिठ्ठीने आपण या गोळ्या घेत असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचाः- पक्ष वाढवायचा असेल तर.., चंद्रकांत पाटलांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिचा भाऊ अॅजिसिलाऊस डेमेट्रीअॅडेट्सला  एनसीबीने अटक केली होती. लोणावळा येथे डेमेट्रीअॅडेट्स राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याच्याकडून 0.८ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर डेमेट्रीअॅडेट्सला खार येथील घराचीही झडती घेण्यात आली. तेथे अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली होती.याशिवाय अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला एनसीबीने अटक केली होती. पॉल हा ऑस्ट्रेलियन असून, तो एका मोठ्या बांधकाम कंपनीत काम करतो. तो वास्तू विशारद आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या