ग्रँटरोडच्या शौचालयात सापडली गुहा! बाहेर निघाल्या बारबाला!!

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या इतिहासप्रेमींना कदाचित ही बातमी वाचून धक्का बसू शकताे. ग्रँटरोडमध्ये नवी गुहा सापडल्याचा गैरसमजही होऊ शकतो. पण तसा गैरसमज बाळगू नका. कारण ही गुहा प्राचीन नव्हे, तर आधुनिक स्वरूपाचे गुन्हे लपवण्यासाठी तयार केलेली मानवनिर्मित गुहा आहे. होय. बारबालांना लपवण्यासाठी ग्रँटरोडमधील एका बारमधील शौचालयात गुहा तयार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कल्पना बारमध्ये तयार करण्यात आलेली ही गुहा अंमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी शोधून काढली.   

बघा, अशी आहे गुहा

कुणावर केली कारवाई

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे बिहारचे सिंगम म्हणून ओळखले जातात. शिवदीप लांडे शनिवारी गस्तीवर असताना त्यांना डायमंड चित्रपटगृहाजवळील कल्पना बारसंदर्भात टीप मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवदीप लांडे यांनी कल्पना बारवर छापा टाकला. तेव्हा हा गुहेचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बारमधील बारमालकासह १२ बारबाला, १८ ग्राहक आणि बारमधील ९ जणांवर कारवाई करण्यात आली. तर ८४ हजार ६०० रुपये जप्त करून बारमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

बारमालकाचं पितळ उघडं

डान्स बारला बंदी असतानाही बारमालकाने बारबाला लपवण्यासाठी ही शक्कल लढवली. पण लांडे यांच्या चतुराईपुढे बारमालकाची ही शक्कल फिकी पडली.


हेही वाचा-

चिमुरड्याचा नाल्यात बुडून मृत्यूप्रकरणी कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर गुन्हा

मुंबई पोलिस आयुक्तपदाची माळ संजय बर्वे यांच्या गळ्यात?


पुढील बातमी
इतर बातम्या