मुंबई पोलिस आयुक्तपदाची माळ संजय बर्वे यांच्या गळ्यात?


मुंबई पोलिस आयुक्तपदाची माळ संजय बर्वे यांच्या गळ्यात?
SHARES

मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांचा कार्यकाळ पूर्ण होत असून त्यांची वर्णी पोलिस महासंचालकपदी होणार आहे. त्याजागी आता मुंबई पोलिस आयुक्तपदाची सुत्रे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांचं नाव चर्चेत आहे. सध्या बर्वे हे राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख आहेत.


सेवेत तीन महिन्यांची मुदतवाढ

महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या पाठोपाठ मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांचा कार्यकालही संपला आहे. माथूर यांच्या निवृत्तीनंतर पोलिस महासंचालकपदी मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती निश्चित आहे. मात्र पडसलगीकर हे देखील ऑगस्ट महिन्यात निवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांना सेवेत तीन महिन्यांची मुदत वाढ दिली जाणार असल्याचं कळतं.


कोण आहेत बर्वे?

मुंबई पोलिस आयुक्तपदी 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांचं नाव पुढे येत आहे. संजय बर्वे हे सध्या राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख आहेत. मुंबई पोलिसआयुक्त पदाच्या शर्यतीत असलेल्या याअनेकांनी शर्यतीत बर्वेंसह अनेक दिग्गज्जांची नावं होती. आयुक्त पदासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न केला. मात्र पालघर पोटनिवडणुकीत भाजप विजयी होणार असल्याचा अचूक अहवाल सादर करत बर्वे यांनी मुख्यमंत्र्यांचं मन जिंकलं. अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय अशी बर्वे यांची ओळख आहे.

30 जून रोजी पोलिस महासंचालक सतीश माथूर हे निवृत्त होत असून त्याजागी पडसलगीकर यांची नियुक्ती केली जाणार आहे. यादरम्यानच मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर जाणार असल्याने ते परत आल्यानंतर आयुक्तपदाबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा