सावधान! अदानी इलेक्ट्रिसिटीच्या नावानं बनावट मेसेज पाठवणाऱ्या टोळीचा सुळसुळाट

एक राजकारणी, दोन चित्रपट व्यक्तिमत्त्वे आणि एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अशा अनेकांना अदानी इलेक्ट्रिसिटी नावानं बनावट मेसेजेस आले आहेत. या बनावट मेसेजेसद्वारे ग्राहकांना "पॉवर डिस्कनेक्शन" करण्याची धमकीच दिली जातेय.

मोडस ऑपरेंडी म्हणजे ग्राहकांना घाबरवणे आणि त्यांना पेमेंट लिंकवर "प्रलंबित थकबाकी" भरण्यास सांगणे. बेस्टने देखील यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. तसंच दोन दिवसांपूर्वी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी देखील महाराष्ट्रातील महावितरणच्या पुरवठा क्षेत्रातील अशा अनेक तक्रारींबाबत ट्विट केले होते. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजला बळी पडू नये यासाठी वीज कंपन्या नागरिकांना सतर्क करत आहेत.

काही ग्राहक मात्र वीज विभागाचे अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या या टोळींच्या बळी पडले आहेत. मुंबई पोलिसांकडे तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत ज्यांचा सायबर सेल तपास करत आहे.

"आम्ही वीज ग्राहकांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करतो. तसेच, तुमचे वैयक्तिक बँक तपशील किंवा OTP अनोळखी व्यक्तींना शेअर करणे टाळा," असे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्याने टीओआयला सांगितले.


हेही वाचा

साकीनाका बलात्कार आणि खून प्रकरण: आरोपी मोहन चौहान दोषी

खोकल्याच्या औषधी बाटल्यांचा मोठा साठा भिवंडीतून जप्त

पुढील बातमी
इतर बातम्या