खोकल्याच्या औषधी बाटल्यांचा मोठा साठा भिवंडीतून जप्त

औषधांच्या आडून नशेखोरांना बाटल्या पुरवल्या जात असल्याप्रकरणी एनसीबीनं मोठी कारवाई केली.

खोकल्याच्या औषधी बाटल्यांचा मोठा साठा भिवंडीतून जप्त
SHARES

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईने कारवाई करून ठाण्यातील भिवंडी येथे 35 लाख रुपये किमतीच्या खोकल्याच्या सिरपच्या बाटल्या जप्त केल्या. औषधांच्या आडून नशेखोरांना बाटल्या पुरवल्या जात असल्याप्रकरणी एनसीबीनं मोठी कारवाई केली. भिवंडीतून (Bhiwandi crime News) याप्रकरणी मोठा साठा एनसीबीनं जप्त केला आहे. खोकल्याच्या औषधी बाटल्यांचा साठा एनसीबीननं हस्तगत केलाय.

तब्बल 8 हजार 640 खोकल्याच्या बाटल्या एनसीबीनं (NCB Raid) जप्त केल्या आहेत. तसंच एक बोलेरो कार आणि एक दुचाकीदेखील जप्त केली आहे. जवळपास 864 किलो कोडीनयुक्त औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या औषधांचा वापर नशा करण्यासाठी केला जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून एनसीबीनं ही कारवाई केली आहे. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय या बाटल्या विकली जाणार असल्याचा संशय एनसीबीला होता. त्यानंतर एनसीबीनं मोठी कारवाई करत भिवंडीतून या खोकल्याच्या औषधांच्या बाटल्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

द विकने दिलेल्या रिपोर्टनुसार, शनिवारी ठाण्याजवळील भिवंडी शहराजवळ एनसीबीनं ही कारवाई केली. यावेळी भिवंडी शहराजवळ आग्रा-मुंबई महामार्गावर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. एका संशयास्पद गाडीला थांबवून या कारची झाडाझडती केली.

झाडाझडती केल्यानंतर कारमध्ये संशयास्पद रीत्या औषधांच्या बाटल्यांची वाहतूक केली जात असल्याचं समोर आलं. यावेळी 8 हजार 640 खोकल्याच्या बाटल्यांचा साठा 60 बॉक्समध्ये ठेवलेला होता. हा साठा लगेचच एनसीबीनं ताब्यात घेतला. नशेसाठी आणि गैरहेतूनं या औषधी बाटल्यांची विक्री केली जात असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.हेही वाचा

धक्कादायक! प्रियकरानं व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्यानं प्रेयसीची आत्महत्या

मालाडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा