मालाडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू

मालाड (पश्चिम) येथील झकेरिया रोड इथं ही घटना घडली.

मालाडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू
SHARES

मालाड परिसरात काल 19 मे रोजी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका 30 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाड (पश्चिम) येथील झकेरिया रोड येथे दुपारी ही घटना घडली. राज कुमार सोनी हा व्यक्ती लघुशंकेसाठी कन्स्ट्रक्शनच्या बाहेर पडला. त्यावेळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब त्याच्यावर पडला. या वेळी या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याला मृत घोषित करण्यात आले.

माहितीनुसार, मृत व्यक्ती इमारतीत असलेल्या ज्वेलरी स्टोअरमध्ये कामाला होता. दरम्यान, इमारतीचा बिल्डर आणि कंत्राटदाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर मालाड पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. पण तेथील बांधकाम व्यावसायिक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही कामगारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून याचा पुढील तपास सुरू असल्याचं बोललं जातंय.हेही वाचा

धक्कादायक! प्रियकरानं व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्यानं प्रेयसीची आत्महत्या

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा