भारतीय मुलींना परदेशात नृत्य कार्यक्रमाच्या नावाखाली नेऊन वेश्या व्यवसायास भाग पाडणाऱ्या बाॅलीवूडमधील अॅग्नेस हॅमिलटन (56) या कोरिओग्राफर महिलेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत पाच ते सहा मुलींना बहरीन, केनिया आणि नैरोबी येथे पाठवल्याची माहिती तिने दिली आहे. न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे.
अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात ही कोरिओग्राफर नृत्य शिकवण्याचे वर्ग घेते. अनेक दिग्गज बाॅलीवूड कलाकारांसोबत अॅग्नेसने काम केले आहे. मुलींना नृत्य शिकवण्यासोबत परदेशातील स्टेज शो मध्ये साईड डान्सर म्हणून काम देण्याचे आमीष ती दाखवायची. एका मुलीमागे ती 40 हजार रुपये कमवायची.
परदेशात या मुलींना पाठवून त्यांच्याकडून पासपोर्ट काढून घेतले जायचे. तुम्हाला येथे आणण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले असून ते वसूल करण्यासाठी संबंधीत व्यक्तीसोबत शारीरिक संबध ठेवावे लागतील. त्याच्याकडून मिळणाऱ्या पैशातून तुम्हालाही वाटा दिला जाईल, अन्यथा तुम्हाला भारतात परतता येणार नाही, असे सांगून त्यांना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले जायचे.
एक गरीब मुलगी अॅग्नेसकडे नृत्य शिकण्यासाठी अाली होती. तिला अॅग्नेसने नृत्याच्या कार्यक्रमासाठी केनियाला पाठवले. तेथे तिची रझिया पटेल या महिलेशी भेट करून देण्यात अाली. रझियाने तिला नैरोबीत नेऊन तिचा पासपोर्ट काढून घेतला अाणि तिला नैरोबीच्या एका वेश्यालयात विकले. एका हॉटेलमध्ये नैरोबी पोलिसांनी धाड टाकल्यानंतर या पीडित मुलीने अापली व्यथा पोलिसांना सांगितली. पोलिसांनी रझिया पटेलला अटक तिचा पासपोर्ट मिळवला अाणि मुलीला भारतात पाठवले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अँग्रसला अटक केली.
हेही वाचा -
EXCLUSIVE: सागरी सुरक्षेसाठी पोलिसांना अत्याधुनिक 'इमिजिएट सपोर्ट व्हेईकल' बोटी
४ कारवायांमध्ये १६ लाखांचे ड्रग्ज हस्तगत; अंमली पदार्थ विभागाची कारवाई