४ कारवायांमध्ये १६ लाखांचे ड्रग्ज हस्तगत; अंमली पदार्थ विभागाची कारवाई

मुंबईत ड्रग्ज तस्करांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर तस्करीवर काही प्रमाणात नियंत्रण बसले. मात्र, त्यानंतरही तस्कर अधूनमधून डोके वर काढत तस्करी करत होते. नुकतंच कांदिवली आणि आझाद मैदानाच्या अंमली पदार्थ विभागाच्या पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या.

४ कारवायांमध्ये १६ लाखांचे  ड्रग्ज हस्तगत; अंमली पदार्थ विभागाची कारवाई
SHARES

अंमली पदार्थ विभागाने दोन दिवसात मुंबईत चार वेगवेगळ्या कारवाया करत ड्रग्ज तस्करांना जेरबंद केलं आहे. या कारवाईत पोलिसांनी १६ लाख रुपयांहून अधिक ड्रग्ज या तस्करांकडून हस्तगत केले अाहे.


मालवणी, कुर्लामध्ये कारवाई

मुंबईत ड्रग्ज  तस्करांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर तस्करीवर काही प्रमाणात  नियंत्रण बसले. मात्र, त्यानंतरही तस्कर अधूनमधून डोके वर काढत तस्करी करत होते. नुकतंच कांदिवली आणि आझाद मैदानाच्या अंमली पदार्थ विभागाच्या पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या. कांदिवली युनिटने मालवणीच्या न्यू कलेक्टर कंपाऊड येथून चरसची तस्करी करण्यासाठी आलेल्या सलीम हबीब खान याला रंगेहाथ अटक करत, त्याच्याजवळून ३ लाख रुपयांचे चरस हस्तगत केले.  तर आझाद मैदान युनिटने लाला कंपाऊड, कल्पना सिनेमा, कुर्ला येथून असगरअली शेख (४२) याला ५ लाख ७५ हजार रुपयांच्या १ किलो चरससह अटक केली.


नायझेरियन तरुणाला अटक

अंधेरी युनिटच्या पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीत एमडी या नशेच्या पावडरची विक्री करण्यासाठी आलेल्या चिन्सो उदेगो (२६) या नायझेरियन तरुणाला अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून ५ लाखांचा एमडीचा साठा हस्तगत केला आहे. तर वरळी युनिटने लक्ष्मण पुदुकोड या तरुणाला नशेसाठी वापरले जाणारे ८१ एलएसडी पेपर आणि गोळयासह अटक केली आहे. याची बाजारात २ लाख ३९ हजार रुपये इतकी किंमत आहे. आरोपींच्या चौकशीतून मूळ तस्करांचा शोध घेणं सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.   



हेही वाचा - 

EXCLUSIVE: सागरी सुरक्षेसाठी पोलिसांना अत्याधुनिक 'इमिजिएट सपोर्ट व्हेईकल' बोटी

मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये मारहाण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा