मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये मारहाण


मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये मारहाण
SHARES

मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर भागात चार वर्षाच्या मुलीला लिफ्टमध्ये कोंडून एका महिलेने मारहाण केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मारहाण करुन मन भरलं नाही म्हणून ही क्रूर महिला त्या चिमुकलीच्या अंगावरही बसली. ही बाब सीसीटिव्हीच्या माध्यमातून उघडकीस आल्यानंतर मुलीच्या घरातल्यांनी ट्राम्बे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


7-8 मिनिटे मारहाण

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहते. बुधवारी  संध्याकाळी ही मुलगी खेळण्यासाठी इमारतीच्या लिफ्टने खाली जात होती. त्याच इमारतीत राहणारी महिला रिझवाना शेख ही देखील लिफ्टमध्ये होती. लिफ्ट बंद होताच तिने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळपास 7-8 मिनिटे आरोपी रिझवाना शेख मुलीला मारहाण करत होती. पूर्व वैमन्यस्यातून रिजवानने हे कृत्य केल्याचं बोललं जातं. 


महिलेला अटक

या मारहाणीत मुलीच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रिझवाना शेख या महिलेला अटक केली आहे. महिलेवर ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला जादूटोणा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.  याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा - 

घटस्फोटीत महिलांना ठगवणारा अटकेत

हज यात्रेच्या नावाखाली २ लाख ८८ हजारांचा गंडा; ट्रॅव्हल्स एजंटला अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय