घटस्फोटीत महिलांना ठगवणारा अटकेत

मूळचा मुंबईचा रहिवाशी असलेला महेश हा विवाह नोंदणी स्थळावर उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या घटस्फोटीत महिलांची माहिती मिळवायचा. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून जवळीकता साधायचा. या महिलांना तो मुंबईत आपला हाॅटेलचा व्यवसाय असून गोव्यातही एका हाॅटेलमध्ये आपण मित्रासोबत भागीदारीत हाॅटेल उघडल्याचं सांगायचा.

घटस्फोटीत महिलांना ठगवणारा अटकेत
SHARES

घटस्फोटीत महिलांशी जवळीकता साधून तसंच आपण उद्योगपती असल्याचं भासवून महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. महेश कुलकर्णी असं या आरोपीचं नाव आहे. आतापर्यंत त्याने ७ महिलांना साडेतेरा लाखांना गंडवल्याचं उघडकीस आलं आहे. इंटरनेटवर घटस्फोटीत महिलांचे प्रोफाईल पाहून तो त्यांना लक्ष्य करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


'असा' साधायचा जवळीक

मूळचा मुंबईचा रहिवाशी असलेला महेश हा विवाह नोंदणी स्थळावर उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या घटस्फोटीत महिलांची माहिती मिळवायचा. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून जवळीकता साधायचा. या महिलांना तो मुंबईत आपला हाॅटेलचा व्यवसाय असून गोव्यातही एका हाॅटेलमध्ये आपण मित्रासोबत भागीदारीत हाॅटेल उघडल्याचं सांगायचा.


कार घेऊन फरार

दरम्यान महेशची नुकतीच एका बंगळुरू येथील उद्योजक महिलेशी ओळख झाली होती. त्याने तिलाही तिच पट्टी पढवली होती. त्यावर विश्वास ठेवून ती उद्योजक महिला त्याच्या जाळ्यात अडकली. एके दिवशी त्याने मी रोजच्या विमानप्रवासाला कंटाळलो आहे. असे सांगून महिलेकडे तिची कार मागितली. विश्वास ठेवून महिलेने त्याला तिची महागडी कार दिली. ती कार घेऊन महेश मुंबईत आला.


'असा' अडकला सापळ्यात

मात्र मुंबईत आल्यानंतर त्याने महिलेचे फोन उचलणं बंद केलं. काही दिवसांनी संबंधित महिलेला महेश विमानतळ परिसरात असल्याचं कळाल्यानंतर तिने त्याला पकडण्यासाठी व्यवसायात २५ लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठी एका निनावी नावाने फोन केला. त्यानंतर महेशला तिने विमानतळ परिसरात बोलावून घेत पोलिसांच्या हवाली केलं.

पोलिस तपासात त्याने आतापर्यंत ७ घटस्फोटीत महिलांना साडेतेेरा लाखांना गंडवल्याचं पुढे आलं आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी महेश विरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा-

हज यात्रेच्या नावाखाली २ लाख ८८ हजारांचा गंडा; ट्रॅव्हल्स एजंटला अटक

बोगस प्रमाणपत्र प्रकरणात ३० डाॅक्टर रडारवर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा