हज यात्रेच्या नावाखाली २ लाख ८८ हजारांचा गंडा; ट्रॅव्हल्स एजंटला अटक


हज यात्रेच्या नावाखाली २ लाख ८८ हजारांचा गंडा; ट्रॅव्हल्स एजंटला अटक
SHARES

हज यात्रेला जाण्यासाठी बुकिंगचे पैसे घेऊन तिकिट न देता नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सर्फराज जैनुदिन जिवरत या ट्रॅव्हल्स एजंटला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे


पैसे घेऊन टाळाटाळ

मुंब्राच्या शिमलापार्क परिसरात राहणारे चौगले मोहम्मद हुसेन यांनी आॅक्टोबर महिन्यात आखाती देशातील हज यात्रेला जाण्यासाठी ६ तिकिटे सर्फराजकडून बुकिंग केली होती. तिकिटाचे २ लाख ८८ हजार रुपयेही भरले होते. त्यानुसार हुसेन यांनी घरात सर्व तयारीही केली होती. मात्र, प्रत्यक्षात रविवारी जेव्हा सौदी अरेबियाला जायची वेळ आली तेव्हा सर्फराजने या यात्रेकरुंना व्हिसा दिला नाही. थातूरमातूर कारणे देऊन सर्फराज हुसेन यांना टाळू लागला. आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर हुसेन यांनी आझाद मैदान पोलिसात तक्रार नोंदवली.


२२ जणांची फसवणूक

तक्रारीनंतर पोलिसांनी हुसेनला अटक करत केली. त्याने अशा प्रकारे आतापर्यंत २२ जणांची फसवणूक करत पासपोर्ट त्यांना परत केल्याची कबुली दिली. तर काहींना त्याने तिकीटांची कागदपत्रे देखील बोगस दिल्याचे निदर्शनास आले. न्यायालयाने त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.हेही वाचा - 

मुंबईवर 'ट्रामाडोल'चं सावट

बोगस प्रमाणपत्र प्रकरणात ३० डाॅक्टर रडारवर
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा