बहुचर्चित उदानी हत्येप्रकरणात आरोपींवर दोषारोपपत्र दाखल

घाटकोपरच्या बहुचर्चित हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी पंतनगर पोलिसांनी मंगळवारी सात ही आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर केले. सध्या हे सातही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी सचिन पवार याने उदानी यांचा त्याच्या प्रेयसीवर असलेली वाईट नजर आणि अवघ्या ५० हजार रुपयांसाठी हत्या केल्याचे १३३० पानी दोषारोपात म्हटलं आहे. या दोषारोपात पोलिसांनी २०४ साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे. दोषारोपपत्रात आरोपींचे मोबाइल टाॅवर लोकेशन, गुन्ह्यात वापरलेली गाडी हे महत्वाचे पुरावे असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

कधी झाले बेपत्ता?

पंतनगर परिसरत राहणारे राजेश्वर किशोरलाल उदानी (५७) यांचं घाटकोपर परिसरात सोने विक्रीचं दुकान आहे. उदानी २८ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त घराबाहेर पडले. मात्र, दुसऱ्या दिवशीही ते परतले नाहीत. उदानी यांच्या स्वभावाचा फायदा घेऊन सचिनने काही फोटो दाखवून त्यांना बोलवून घेतले. त्यानंतर त्यांना नवी मुंबईतल्या रबाळे स्थानकावर आणण्यात आले. त्याठिकाणी उदानी यांच्या गाडीत दिनेश पवार, सिद्धेश पाटील, महेश भोईर यांनी उदानी यांची गळा आवळून हत्या केली. तसंच त्यांच्या अंगावरील मौल्यवान दागिने आणि पैसे काढून घेतले. त्यानंतर या आरोपींना उदानीचा मृतदेह पनवेलजवळील देहरंगयेथील तलावाजवळील झुडपात टाकून तेथून पळ काढला. बेपत्ता उदानींच्या कुटुंबीयांनी २९ नोव्हेंबर पंतनगर पोलिसांत बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली होती.

'इथं' सापडला मृतदेह

राजेश्वर ज्या कारमधून निघाले होते, ती गाडी २९ नोव्हेंबरला रात्री घाटकोपर पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या विक्रोळी वाहतूक चौकीसमोर सापडली. त्यानंतर ३ डिसेंबरला पनवेल येथील नेरे परिसरात एक बेवारस मृतदेह आढळून आला. राजेश्वर यांची ओळख पटू नये यासाठी चार ही आरोपींना त्यांना नग्नावस्थेत सोडले. या प्रकरणी पोलिसांनी ३ डिसेंबरला अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी २५ जणांची चौकशी केली. त्यानंतर राजेश्वर यांच्या मोबाइल रेकॉर्डनुसार एका मंत्र्याचे माजी स्वीय सचिव सचिन पवारसह टप्या टप्याने सात जणांना अटक केली. पुढे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

५० हजारांसाठी हत्या

उदानीने त्याच्या मुलीच्या लग्नात इव्हेंट मेनेजमेन्टचे काम सचिनला दिले होते. त्यावेळी सचिने उदानी यांच्याकडून ५० हजार जास्त घेतले. ही बाब उदानीला कळाल्यानंतर त्याने सचिनकडे पैशासाठी तगादा लावला होता. यातूनच सचिनने उदानीची हत्या केल्याची कबूली दिल्याचं पोलिसांनी दोषारोपपत्रात म्हटलं आहे.

आसामला पळ 

हत्येवेळी सचिन जरी उपस्थित नसला तरी फोनवरून तो इतर आरोपींना मार्गदर्शन करत होता. उदानीची हत्या करून दिनेश हा मुरूड येथे महिला आरोपी निखताल घेऊन गेला. या हत्याकांडासाठी सर्वानीच नवीन सीमकार्ड घेतलं होतं. विशेष म्हणजे या हत्याकांडानंतर सर्वांनी आपले मोबाइल सिमकार्ड आणि अंगावरील कपडेही जाळत पुरावे नष्ट केले. मात्र या सर्वांनी उदानी यांना मारण्यासाठी जी गाडी वापरली ती गाडी दोन दिवसांपूर्वी आरोपींनी एका मॅकेनिककडे सर्व्हिसिंगसाठी नेली होती. त्या ठिकाणी मेकॅनिकच्या न कळत त्यांनी दुसऱ्या गाडीची नंबरप्लेट स्वत:च्या गाडीला लावून स्वत:ची नंबरप्लेट तेथेच सोडून गेल्याने पोलिसांच्या जाळ्यात सर्वजण अडकले. उदानीची हत्या झाल्याचे कळताच सचिनने कुणालाही संशय येऊ नये म्हणून गुवाहाटी येथे पळ काढला.


हेही वाचा -

कुर्ला इथं गुंडाची गोळ्या घालून हत्या

चंदा कोचर यांची ईडीने केली सलग ११ तास चौकशी


पुढील बातमी
इतर बातम्या