चंदा कोचर यांची ईडीने केली सलग ११ तास चौकशी

सोमवारी ईडीनं चंदा कोचर यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार चौकशीस हजर झालेल्या चंदा यांची तब्बल ११ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीत चंदा या सहकार्य करत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

चंदा कोचर यांची ईडीने केली सलग ११ तास चौकशी
SHARES

पदाचा गैरवापर करत कर्ज दिल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांची ईडीनं सोमवारी ११ तास चौकशी केली. चौकशीत चंदा कोचर या सहकार्य करत नसल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.  ईडीनं आणि सीबीआयनं काही दिवसांपूर्वी व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी नरिमन पॉईंट, वांद्रे-कुर्ला संकुलसह (बीकेसी) मुंबईतील चार ठिकाणी आणि औरंगाबाद इथं छापा टाकला होता.  व्हिडीओकॉन आणि सुप्रीम एनर्जीच्या कार्यालयांवर हे छापे टाकले होते. 


कर्जप्रकरण भोवलं

कोचर या बँकेच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ असताना त्यांनी व्हिडीओकॉन कंपनीला पदाचा गैरवापर करत ३ हजार २५० कोटींचं कर्ज दिलं. हे कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितलं आणि त्याचा फायदा घेतला असा त्यांच्यावर आरोप होता. चंदा कोचर यांना कर्जप्रकरण भोवलं आणि आयसीआयसीआय बँकेच्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. जून महिन्यापासून त्या सक्तीच्या रजेवर होत्या. बँकेच्या संचालक मंडळाचा आणि शेअर धारकांचा दबाव असल्यानं शेवटी त्यांनी संचालक मंडळाकडे निवृत्तीचा अर्ज केला आणि सर्व पदांचे राजीनामा दिला.

मालमत्ता हस्तगत

 व्हिडीओकॉन कंपनीनं ते कर्ज बुडवलं. ही माहिती बाहेर आल्यानंतर कोचर यांच्या कार्यपद्धतीवर आणि हेतूवरच टीका होऊ लागली. त्यानंतर ईडी आणि सीबीआयनं या गैरव्यवहारप्रकरणी व्हिडिओकॉन कंपनीच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील कार्यालयावर छापे टाकत काही महत्वाची मालमत्ता हस्तगत केली आहे. या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सोमवारी ईडीनं चंदा कोचर यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार चौकशीस हजर झालेल्या चंदा यांची तब्बल ११ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीत चंदा या सहकार्य करत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.



हेही वाचा 

चांदीप बंदरावर स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा