चांदीप बंदरावर स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ

पालघरच्या जिल्हा अधीक्षकांच्या पथकाने चांदीप रेती बंदरावर कारवाई केली. त्या कारवाईदरम्यान, २४ जिलेटीनच्या कांड्या आणि स्फोटक पदार्थ पोलिसांना सापडले.

चांदीप बंदरावर स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ
SHARES

पालघर जिल्ह्यात रविवारी रात्री जिलेटीनच्या कांड्या आणि स्फोटक पदार्थ सापडल्याने मोठी खळबळ माजली होती. पालघरच्या जिल्हा अधीक्षकांच्या एका पथकाने चांदीप रेती बंदरावर कारवाई केली. त्या कारवाईवेळी २४ जिलेटीनच्या कांड्या आणि स्फोटक पदार्थ पोलिसांना सापडले.


अज्ञाताविरोधात गुन्हा

चांदीप रेती बंदरात अवैधरित्या सक्शन पंपाच्या साहाय्याने  रेती उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत रेतीनं भरलेल्या गाड्या जप्त केल्या. तसंच आसपासच्या परिसराची झडती घेताना एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या आणि काही स्फोटक पदार्थ असल्याचं आढळलं. यानंतर पोलिसांच्या पथकाने त्वरित बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला बोलावून स्फोटक पदार्थ तपासण्यासाठी दिले. कारवाईदरम्यान,आरोपी न सापडल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


रेतीसाठी स्फोटके ?

अनेकदा रेती माफियांकडून नदीखाली स्फोट करून पाण्याखाली पसरलेली रेती मशीनच्या साहाय्याने काठावर जमा करण्यासारखे प्रकार घडतात. हा त्यापैकीच एक प्रकार असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.


घरात स्फोटके

वसई पूर्व भागातील सायवन गावात एका घरामधून स्फोटकं सापडल्याची माहिती समोर आली आहे. विरार पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एका दांपत्याच्या राहत्या घरी पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकला. यामध्ये १८३ जिलेटीन कांड्या, १०३ इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर, ३४५ नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आदी स्फोटके आढळली. तुकाराम हडळ आणि भीमा हडळ असं या दांपत्याचं नाव असून दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - 

सर्व वाहतूक सेवांसाठी सिंगल तिकीट योजना

११ लाख पदव्यांचा तपशील पडताळणीसाठी ऑनलाइन उपलब्ध
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा