सर्व वाहतूक सेवांसाठी सिंगल तिकीट योजना

पुढील वर्षात सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणत सिंगल तिकीट योजना उपलब्ध करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

SHARE

मुंबईत सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण येत्या काळात प्रवाशांना विविध वाहतूक सेवांसाठी वेगवेगळं तिकीट काढण्याची गरज लागणार नाही. पुढील वर्षात सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणत सिंगल तिकीट योजना उपलब्ध करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


एकात्मिक तिकिट प्रणाली 

टॅक्सी, उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे यांसारख्या परिवहन सेवांसाठी एकात्मिक तिकिट प्रणाली आणण्यात येणार आहे. म्हणजे एका तिकिटावर सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करता येणार आहे.  वेगवेगळं तिकिट काढण्याची गरज भासणार नाही. रविवारी मध्य रेल्वे मार्गावरील परळ टर्मिनसच्या लोकार्पणावेळी  मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना ही माहिती दिली.


प्रवास करणं सहज शक्य

सर्व परिवहन सेवांसाठी एकात्मिक तिकिट प्रणाली सुरु झाल्यानंतर प्रवाशांचा लांब रांगेत उभं राहून तिकीट काढण्याचा त्रास वाचणार आहे. तसंच कोणत्याही ठिकाणी कोणत्याही सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळं या एकात्मिक तिकिट प्रणालीला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

मुंबईतील विनाअनुदानित शिक्षिकांची मातोश्रीवर धडक

मंतरलेल्या घरात' पुन्हा एकत्र आले सुयश-सुरुचीसंबंधित विषय
ताज्या बातम्या