मुंबईतील विनाअनुदानित शिक्षिकांची मातोश्रीवर धडक

शाळा अनुदानाच्या प्रमुख मागणीसाठी शासन स्तरावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या शिक्षिकांनी सोमवारी सकाळपासून मातोश्रीबाहेर आंदोलन सुरू केले.

SHARE

गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी शाळांचे अनुदान या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील खाजगी प्राथमिक विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिक्षिकांनी मातोश्रीबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या १०४ मराठी खाजगी शाळांसाठी अनुदान द्या, आणि मराठी शाळा वाचवा या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील विनाअनुदानित शिक्षकांनी आझाद मैदानात गेल्या २२ दिवसांपासून आंदोलन पुकारलं आहे. 


नेमकं प्रकरण काय ?

काही वर्षांपूर्वी बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने मान्यता दिलेल्या खाजगी प्राथमिक शाळांच्या अनुदानाची यादी जाहीर केली होती. परंतु त्यानंतर राज्य शासनाच्या ५०% अनुदानाचं कारण पुढं करून पालिका शिक्षण विभाग आपली जबाबदारी झटकली. यामुळे मुंबईतील खाजगी प्राथमिक विनाअनुदानित शाळांना पालिकेचं अनुदान मिळालं नाही. विशेष म्हणजे शाळांना अनुदान मिळावं या प्रमुख मागणीसाठी गेल्या २२ दिवसांपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र त्यानंतरही शाळा अनुदानाच्या प्रमुख मागणीसाठी शासन स्तरावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या शिक्षिकांनी सोमवारी सकाळपासून मातोश्रीबाहेर आंदोलन सुरू केले. 


आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

आंदोलनाची पालिका आयुक्तांनी योग्य ती भूमिका न घेतल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर थेट धडक दिली. या आंदोलनानंतर अवघ्या काही तासात पालिका शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी मंगळवारपर्यंत अनुदानाचा विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानंतर मुंबईतील खाजगी प्राथमिक विनाअनुदानित शिक्षिकांनी आंदोलन स्थगित केलं. हेही वाचा -

उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी मोनोच्या सेवेत विघ्न

गिरगाव आणि जुहू चौपाटीला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जासंबंधित विषय
ताज्या बातम्या