उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी मोनोच्या सेवेत विघ्न

सोमवारी दुपारच्या सुमारास मोनोच्या वडाळा डेपो स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने मोनो रेल्वेची वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती.

SHARE

उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीचे मोनोच्या सेवेत विघ्न आल्याचं पहायला मिळालं. सोमवारी दुपारच्या सुमारास मोनोच्या वडाळा डेपो स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने मोनो रेल्वेची वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे दोन वर्षांच्या कालावधीनंतर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आलं होतं. 


प्रवाशांची गैरसोय

मोनोचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा कार्यान्वित यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला होता. त्यानंतर रविवारी वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. मात्र, दुसऱ्या दिवशीच वडाळा डेपो स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोनोची वाहतूक बंद झाली. दुपारी १ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासापेक्षा अधिक काळासाठी मोनोची सेवा बंद होती. तांत्रिक बिघाडानंतर प्रवाशांना तातडीने मोनोमधून उतरवण्यात आलं. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यापूर्वीही मोनोचा पहिला टप्पा आगीच्या घटनेनंतर अनेक दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला होता. 
हेही वाचा -

सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

प्रिया दत्त पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात? पूनम महाजनांविरोधात लढण्याची शक्यता
संबंधित विषय
ताज्या बातम्या